>> नीलिमा प्रधान
मेष – नोकरीत व्याप होतील
मेषेच्या चतुर्थात सूर्य, पंचमेषात बुध. गोड बोलून तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होईल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. नोकरीत व्याप होतील. धंद्यात खर्च, तणाव जाणवतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ, मानसिक तणाव जाणवेल. विरोधक टीकात्मक टिप्पणी करतील. नात्यात, मैत्रीत नाराजी जाणवेल.
शुभ दिनांक : 14, 15
वृषभ – वर्चस्व वाढेल
वृषभेच्या पराक्रमात सूर्य, चतुर्थात बुध. कोणताही करार करताना योग्य सल्ला घ्या. तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी दिसेल. उतावळेपणा नको. सर्वत्र सावध रहा. क्षुल्लक तणाव, वाद जाणवतील. प्रवासात कटकटी होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठ कठीण कामे देतील. चर्चेत यश मिळेल. नवीन परिचय फायदेशीर ठरतील.
शुभ दिनांक : 17, 18
मिथुन – यश प्राप्त कराल
मिथुनेच्या धनेषात सूर्य, पराक्रमात बुध. रागाचा पारा न वाढवता काम कराल तरच यश खेचून आणता येईल. नोकरीत वरिष्ठांचे मन जिंकता येईल. रेंगाळलेली कामे करून घ्या. धंद्यातील चूक सुधारता येईल. गोड बोला. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात बुद्धिचातुर्याने वागल्यास समस्या सोडवता येतील. लोकप्रियता व प्रतिष्ठा मिळेल.
शुभ दिनांक : 14, 15
कर्क – धंद्यात वाढ होईल
स्वराशीत सूर्य, कर्केच्या धनेषात बुध कुणालाही कमी लेखू नका म्हणजे यश मिळवणे कठीण नाही. कला, क्रीडा, साहित्यात विशेष यश, उत्साह, आत्मविश्वास वाढेल. नोकरीतील तणाव कमी कराल. धंद्यात वाढ होईल. नवा विचार, चर्चा करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतचे महत्त्व, टिकवण्यासाठी पूर्ण मेहनत घ्या. आर्थिक साहाय्य मिळवता येईल.
शुभ दिनांक : 17, 18
सिंह – वाद वाढवू नका
सिंहेच्या व्ययेषात सूर्य, स्वराशीत बुध. सौम्य धोरण, सहनशीलता, बुद्धिमत्ता यावर यश मिळवावे. नोकरीत सावध रहा. वाद वाढवू नका. धंद्यात मोह, अहंकार नुकसानकारक ठरेल. वस्तू सांभाळा. व्यसन नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून मुद्दे मांडा. चांगले वर्तन ठेवा. प्रकृतीकडे लक्ष द्या. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. प्रतिष्ठा जपा.
शुभ दिनांक : 14, 15
कन्या – कामाची प्रशंसा होईल
कन्येच्या एकादशात सूर्य, व्ययेषात बुध. प्रत्येक दिवस यश वाढवणारा आहे. शब्द वापरताना काळजी घ्या. नोकरीत कामाची प्रशंसा, बढती, बदलीची शक्यता. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या शब्दाला मान देऊन निर्णय घ्यावा लागेल. प्रतिष्ठा, लोकप्रियता वाढवणारे काम करा. कठीण कामे रेंगाळत ठेऊ नका.
शुभ दिनांक : 14, 15
तूळ – रागावर ताबा ठेवा
तूळेच्या दशमेषात सूर्य, एकादशात बुध. अनेक रेंगाळलेली कामे करा. प्रयत्नाने यश खेचता येईल. रागाचा पारा वाढवू नका. कौशल्याने व प्रेमाने मने जिंका. नोकरीत कठीण कामे करून दाखवाल. धंद्यात मोठा लाभ होईल. प्रवासात सावध रहा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेकांचे गैरसमज दूर करून प्रगतीच्या दिशेने जाता येईल.
शुभ दिनांक : 18, 19
वृश्चिक – कामांना गती मिळेल
वृश्चिकेच्या भाग्येषात सूर्य, दशमेषात बुध. बुधवारपासून अनेक कामांना गती देता येईल. व्यवहारात लाभ होईल. थोरामोठय़ांचा सहवास लाभेल. धंद्यात नवे धोरण ठरवता येईल. मोठे काम मिळवा. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अर्धवट कामे पूर्ण कराल. गैरसमज, तणाव दूर करून उमेदीने प्रगतीचा नवा टप्पा गाठता येईल.
शुभ दिनांक : 18, 19
धनु – प्रकृतीची काळजी घ्या
धनुच्या अष्टमेषात सूर्य, भाग्येषात बुध. शारीरिक, मानसिक दडपण वाढेल. सुटत आलेल्या समस्येला कदाचित वेगळीच कलाटणी मिळेल. जवळच्या व्यक्ती दूर गेल्यासारख्या वागतील. प्रकृतीची काळजी घ्या. व्यसन नको. नोकरी टिकवा. वाद वाढवू नका. धंद्यात फसगत, नुकसान होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज होईल. अपमानकारक वागणूक मिळेल.
शुभ दिनांक : 14, 15
मकर – सावधपणे निर्णय घ्या
मकरेच्या सप्तमात सूर्य, अष्टमात बुध. प्रतिष्ठा पणाला लावून धोका पत्करू नका. मेहनत घ्या. कठोर शब्द वापरू नका. कायद्याला धरूनच वक्तव्य करा. नोकरीत दगदग, धावपळ होईल. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. फसगत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा वाढेल. तुमचे धोरण इतरांना पटणे कठीण वाटेल. महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी घाई नको.
शुभ दिनांक : 17, 18
कुंभ – महत्त्वाच्या वस्तू जपा
कुंभेच्या षष्ठेशात सूर्य, सप्तमेषात बुध. प्रत्येक दिवस यश खेचून आणणारा आहे. तरीही उतावळेपणा नको. रागावर ताबा ठेवा. अहंकाराची भाषा धोका निर्माण करेल. नोकरीत नम्रता ठेवा. चूक टाळा. धंद्यात हिशेब सांभाळा. महत्त्वाच्या वस्तू जपा. प्रवासात धोका पत्करू नका. विरोधाला कमी समजू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आव्हानात्मक आरोप होतील.
शुभ दिनांक : 19, 20
मीन – अहंकार बाळगू नका
मीनेच्या पंचमेषात सूर्य, षष्ठात बुध. सप्ताहाच्या सुरूवातीला तारतम्य ठेवा. कायद्याला स्मरून विधान करा. नोकरीच्या कामात चूक टाळा. वरिष्ठांशी एकमत होईल. धंद्यात चर्चा करताना घाई नको. नवा पर्याय शोधता येईल. नविन परिचय प्रेरणादायक वाटेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील गांभीर्य लक्षात घेऊन वागा. संधीची वाट पहा.
शुभ दिनांक : 19, 20