
अवघ्या दीड वर्षामध्ये नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांचे सरकार कोसळले आहे. संसदेत विश्वासदर्शक ठराव हरल्यामुळे 19 महिने पंतप्रधान पदावर राहिलेले प्रचंड यांना पंतप्रधान पद सोडावे लागणार आहे.
माजी पंतप्रधान के. पी. शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सीएपीएन-यूएमएल पक्षाने प्रचंड यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर प्रचंड यांचे सरकार अल्पमतात आले होते.