पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक नाही; प्रवाशांना दिलासा

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी (14 जुलै 2024 रोजी) कोणाताही ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे रविवारी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

ट्रॅक, ओव्हरहेड आणि सिग्नलिंग उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी शनिवारी (ता. 13/14 तारखेला) मध्यरात्री 00.15 ते 04.15 या वेळेत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत, सर्व जलद मार्गावरील गाड्या सांताक्रूझ आणि चर्चगेट स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालवल्या जातील.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शनिवारी मध्यरात्री जंहो ब्लॉक घेण्यात येत असल्याने रविवारी (ता. 14 जुलै 2024 रोजी) पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.