Jalna News : जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवले, दोघांचा जागीच मृत्यू

जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवर बदनापूर जवळील वरुडीकडून बदनापूरकडे जाणाऱ्या दुचाकीला अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या गंभीर अपघातात दुचाकीवरील दोण जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर घटना जालना-छत्रपती संभाजीनगर रोडवरील वरुडीफाट्यावर घडली आहे. आज (12 जुलै) सकाळी 10 च्या सुमारास कलिम अब्दुल नबी व नाजीम हमीद पठान हे युवक दुचाकीवरुन बदनापूरला निघाले होते. यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली आणि या गंभीर अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब सहाणे व जमादार बाबासाहेब जऱ्हाड यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पुढील कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत. परंतु याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.