जो करेगा जाती की बात, उसको मारूंगा कसकर लात…जातीपातीच्या राजकारणावर नितीन गडकरींचा संताप

स्पष्टवक्तेपणा आणि परखडपणे मते मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव घेतले जाते. तसेच त्यांच्या अनेक परख़ड व्यक्तव्यांमुळे ते चर्चेत असतात. सध्या राज्यात मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. आता नितीन गडकरी यांनी स्पष्टपणे जातीपातीच्या राजकारणावर आपले मत व्यक्त केले आहे. मी जात-पात मानत नाही. ‘जो करेगा जाती की बात, उसको मारूंगा कसकर लात…’ असे विधान करत त्यांनी इशारा दिला आहे. म्हणजेच जो जातिपातीची बात करेल, त्याला मी जोरदार लाथ मारेन, असे म्हटत त्यांनी जातीपातीच्या राजकारणावर संताप व्यक्त केला आहे.

राजकारणासारख्या क्षेत्रातही जातिपातीचे राजकारण होत आहे. अनेक नेते आणि काही राजकीय पक्ष जातिपातीचे राजकारण करत असतात. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीपातीच्या राजकारणावर जबरदस्त टीका करत संताप व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या जातिपातीचं राजकारण होत आहे. मी जात-पात मानत नाही. जो जातिपातीची बात करेल, त्याला मी जोरदार लाथ मारेन, असा इशारा त्यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना दिला.

माझ्या मतदारसंघात 40 टक्के मुसलमान आहेत. मी त्यांना आधीच सांगितलं की, मी आरएसएसचा माणूस आहे. मी हाफ चड्डीवाला आहे. कुणालाही मत देण्यापूर्वी नंतर आपल्याला पुढे पश्चाताप होणार नाही याचा विचार केला पाहिजे. जो मला मतदान करेल त्याचं मी काम करणार आणि जो मत देणार नाही त्याचंही काम करणार, असे गडकरी यांनी स्पष्ट केले.