जयपूर: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF अधिकाऱ्याला लगावली चपराक; झाली अटक, अधिकाऱ्यानंही काढली छेड?

SpiceJet employee slaps cop

स्पाइसजेटच्या एका महिला कर्मचाऱ्याला गुरुवारी अटक करण्यात आली आहे. तिने सुरक्षा तपासणीवरून झालेल्या वादात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) अधिकाऱ्याला थप्पड मारल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. मात्र त्याच वेळी CISF अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप करत विमान कंपनीने कर्मचाऱ्यांच्या बाजूने बाजू मांडली.

स्पाइसजेटच्या अन्न पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अनुराधा राणी या पहाटे 4 च्या सुमारास वाहनाच्या गेटमधून इतर कर्मचाऱ्यांसह विमानतळावर प्रवेश करत असताना सहायक उपनिरीक्षक गिरिराज प्रसाद यांनी गेट वापरण्याची वैध परवानगी नसल्यामुळे त्यांना थांबवले. त्यांनी तिला जवळच्या प्रवेशद्वारावर एअरलाइन क्रूसाठी स्क्रीनिंग करण्यास सांगितलं.

CISF च्या म्हणण्यानुसार, त्यावेळी स्क्रीनिंग रूमजवळ एकही महिला पोलीस नव्हती. गिरीराज प्रसाद यांनी महिला कर्मचाऱ्यांना स्क्रीनिंगसाठी बोलावले पण तोपर्यंत त्यांच्यात आणि राणीमध्ये वाद झाला. महिला कर्मचारी घटनास्थळी आल्यानंतरही हे सुरूच राहिले आणि मग संतापलेल्या राणी यांनी प्रसाद यांना जोरदार चपराक लगावली.

CISF च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे’.

तर, विमान कंपनीने एक निवेदन जारी करून CISF अधिकारी प्रसाद यांच्यावर ठपका ठेवला आहे. ही दुर्दैवी घटना असल्याचे सांगून, स्पाईसजेट एअरलाइन्सने सांगितलं की, ‘गेटवर कॅटरिंग वाहन घेऊन जात असताना, आमच्या महिला सुरक्षा कर्मचारी सदस्य, ज्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्यूरो (बीसीएएस), हिंदुस्थानच्या नागरी उड्डयन सुरक्षा ब्युरोने जारी केलेला वैध विमानतळ प्रवेश पास होता. रेग्युलेटरला CISF कर्मचाऱ्यांनी अनुचित आणि अश्लील भाषेचा वापर केला होता, ज्यात तिला त्याच्या ड्युटी संपल्यानंतर घरी येऊन भेट अशी भाषा त्याने वापरली होती’.

विमान कंपनीने सांगितलं की त्यांनी त्यांच्या महिला कर्मचाऱ्याच्या कथित लैंगिक छळाच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे.