मोदींच्या गुजरातमध्ये नोकऱ्यांसाठी चेंगराचेंगरी; वर्षाला 2 कोटी रोजगाराची बोगस गॅरंटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याची दिलेली गॅरंटी बोगस निघाली आहे. मोदींच्या गुजरातमध्येच बेरोजगारीचे भीषण दृश्य पाहायला मिळाले. भरूचमध्ये अंकलेश्वर येथील हॉटेलमध्ये खासगी पंपनीने नोकरीसाठी मुलाखती ठेवल्या होत्या. तिथे प्रचंड गर्दी उसळली. चेंगराचेंगरी आणि रेटारेटी झाली. त्यात रेलिंग कोसळून अनेक जण जखमी झाले.

देशात बेरोजगारी प्रचंड वाढली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षाला 2 कोटी रोजगार निर्माण करण्याची दिलेली गॅरंटी बोगस निघाली आहे. बेरोजगार तरुणांसाठी कोणत्याही प्रकारचे ठोस धोरण पेंद्र सरकार राबवू शकले नसल्याचेच उघड झाले आहे. कुणी नोकरी देते का नोकरी अशी आर्त आर्जव करण्याची वेळ तरुणांवर आली आहे. याची प्रचीती गुजरातच्या भरूचमध्ये नोकरीसाठी प्रचंड गर्दी होऊन झालेल्या चेंगराचेंगरीमुळे आली. जिह्यातील औद्योगिक वसाहत असलेल्या अंकलेश्वर येथील एका हॉटेलमध्ये खासगी पंपनीने नोकरीसाठी वॉक इन मुलाखत आयोजित केली होती. मुलाखतीसाठी हजारो बेरोजगार अक्षरशः तुटून पडले आणि हॉटेलचे रेलिंग कोसळून संपूर्ण आयोजनाचाच पुरता बोऱया वाजला.

देशात किती प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे हेच गुजरातमधील भरूच येथील घटनेवरून सिद्ध झाले आहे. अंकलेश्वर येथील लॉर्डस् प्लाजा हॉटेलमध्ये ही घटना घडली. थरमॅक्स पंपनीने केवळ दहा पदांसाठी वॉक इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.

बेरोजगारी महामारीप्रमाणे पसरतेय -राहुल गांधी
हिंदुस्थानात बेरोजगारी एखाद्या महामारीप्रमाणे पसरत आहे आणि भाजपशासित गुजरात या आगाराचे एपी सेंटर बनले आहे.एका नोकरीसाठी रांगेत धक्के खाणारे हिंदुस्थानचे भविष्य हेच नरेंद्र मोदींच्या अमृतकालचे सत्य आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपवर केली आहे. गुजरातमध्ये भाजपच्या गेल्या 30 वर्षांच्या सत्ताकाळात बेरोजगारीने कहर केला असून जर नोकऱया हव्या असतील तर गुजरात विधानसभेत पुढच्या वेळी काँग्रेसच्या बाजूने उभे राहा, असे आवाहनही नेटकऱयांनी केले आहे.