
कोस्टल रोडवर उद्या शुक्रवार, 12 जुलैपासून ‘बेस्ट’ची एसी बस धावणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रशस्थ कोस्टल रोडवरून गारेगार प्रवास करता येणार आहे. बेस्टची नवीन वातानुपूलित बसमार्ग क्र. ए- 78 ही बस एन.सी.पी.ए. (नरीमन पॉइंट) आणि भायखळा स्थानक (प) दरम्यान मरीन ड्राईव्ह, ‘स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सागरी किनारा मार्ग’ दरम्यान धावणार आहे. एन.सी.पी.ए (नरीमन पॉइंट) येथून बस सकाळी 8.50 वाजता सुटेल आणि शेवटची बस सायंकाळी 9 वाजता सुटेल तर भायखळा स्थानक (प.) येथून सकाळी 8 वाजता सुटेल. शेवटची बस रात्री 8 50 वाजता सुटेल. या बसचे प्रवास भाडे किमान 6 रुपये तर कमाल भाडे 19 रुपये आकारण्यात येईल.
दरम्यान, हाजी अली ते वरळी बिंदुमाधव चौकपर्यंत उत्तरेकडे जाणारी चार लेनची मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आल्यानंतर सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुमारे 1500 वाहनांनी या मार्गावरून पहिल्याच दिवशी प्रवास केला.