दापोलीची कन्या राष्ट्रीय स्तरावर चमकली; वैदेही खेडेकरचा नायपर जेईई परिक्षेत देशात 21 वा क्रमांक

नायपर जेईई 2024 या राष्ट्रीय स्तरावरील संयुक्त प्रवेश परीक्षेत वैदेही विवेकानंद खेडेकर या रत्नागिरीच्या विदयार्थीनीने देशात 21 वा क्रमांक प्राप्त केला. दापोलीच्या कन्येने राष्ट्रीय स्तरावर मिळविलेल्या या दैदिप्यमान यशामुळे सुसंस्कृत दापोलीचे शैक्षणिकदृष्टया ईतिहासाचे पान सुवर्ण अक्षराने लिहीले गेले आहेच शिवाय दापोलीच्या शिरपेचात एक मानाचा तुराही रोवला गेला आहे. यामुळे दापोलीतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नॅशनल इन्स्टिट्याुट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, फार्मास्युटिकल्स विभाग, रसायने आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे नायपर जेईई ही परीक्षा घेण्यात येते. या परिक्षेत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन करताना वैदेही खेडेकर या दापोलीतील विदयार्थीनीने नायपर जेईई मध्ये 21 वा तर जी पॅट परिक्षेमध्ये 1217 ऑल इंडिया रँकिंग प्राप्त केली. नायपर प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे औषध निर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो.

रत्नागिरी जिल्हयातील दापोली या तालूक्यातील तालूका ठिकाणापासून कोसो दुर ग्रामीण भागातील भडवळे हे वैदेही खेडकर हीचे मुळ गाव आहे. प्राथमिक शिक्षण तिने आपल्या भडवळे गावी तर 5 वी ते 12 वी पर्यंतचे शिक्षण दापोली शहरातील सुप्रसिध्द ए.जी. हायस्कुलमध्ये झाले येथेचे तिला ख-या अर्थाने दिशा मिळाली आणि तिने आपल्या पुढील शिक्षणासाठी रत्नागिरी येथे दाखल होत. रत्नागिरीच्या शासकिय महाविदयालयातुन बी फार्म पदवी घेतली. पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने नॅशनल इंस्टयुट आणि रिसर्च (नायपर) ची जेईई परिक्षा दिली. त्या परिक्षेत वैदेही देशातून 21 वी (आॅल इंडिया रॅक 21) आली आहे. त्यासोबतच तिने जी पॅट ( ग्रॅज्यूएट फार्मासी एप्टीटयुड टेस्ट) परिक्षाही दिली. जी पॅट परिक्षेला देशातून 60 ते 70 हजार विदयार्थी प्रविश्ठ असतात. त्याही परिक्षेत देशातून तिने 1217 वा क्रमांक पटावला आहे. या तिच्या दैदिप्यमान यशामुळे आता पंजाब राज्यातील मोहाली येथील नायपर या अत्यंत प्रष्ठिेच्या महाविदयालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा तिचा मार्ग प्रशस्त झाला आहे.