
स्मार्ट मीटर आणि वीज दरवाढविरोधात मुंबई काँग्रेसने आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि काँग्रेसच्या नेत्यांना बीकेसी पोलीस ठाण्यात बसवून ठेवले तर मोर्चात येणाऱया बसेस व वाहनेही अडवली. मोर्चाला परवानगी नाकारून भाजप सरकारने अदानीला संरक्षण दिले, असा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
मुंबई काँग्रेसने राज्य सरकार आणि अदानी पंपनीविरोधात आंदोलन केले. घरगुती वीजदरात वाढ आणि स्मार्ट मीटरच्या विरोधातील जनक्षोभ रोखण्यासाठी सरकारने पोलिसांना पुढे करून दडपशाही करण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारला गोरगरीबांच्या दुःखाचे काही सोयरसुतक नाही. कारण हे सरकार मूठभर धनदांडग्यांसाठीच काम करते, असा संताप काँग्रेसने व्यक्त केला.