
शिव आरोग्य सेनेच्या प्रयत्नांमुळे ब्रेन स्ट्रोक आलेल्या ठाण्यातील एका रुग्णाला जीवदान मिळाले आहे. या रुग्णावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करणाऱया घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांचे नुकतेच शिव आरोग्य सेनेच्या वतीने आभार मानले आहेत.
ठाण्यातील मनोज बनसोडे नावाच्या व्यक्तीने ब्रेन स्ट्रोक आलेल्या आपल्या लहान भावासाठी शिव आरोग्य सेनेकडे मदतीचा हात मागितला. शिव आरोग्य सेनेचे कार्याध्यक्ष डॉ. किशोर ठाणेकर, उपाध्यक्ष डॉ. जयवंत गाडे आणि शिव आरोग्य सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक जितेंद्र सकपाळ यांच्या सूचनेनुसार ठाणे जिह्याचे शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी डॉ. प्रशांत भुईंबर यांनी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाणी व सचिन भांगे यांच्याकडे रुग्णाला राजावाडी रुग्णालयात मदत मिळावी यासाठी विनंती केली. वाणी व त्यांच्या सहकाऱयांनी रुग्णाला अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारती राजुलवाल, डॉ. सचिन पायेंनवार, डॉ. मनीष यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अनन्या मुखर्जी, डॉ. गौरी ओक, डॉ. साद शेख, डॉ. संदीप वाढवे, डॉ. शिवांजली गोरे. डॉ. पूजा चौरसिया, डॉ. गौरव गोमासे, डॉ. रिषभ राजुळवाल यांच्या अथक प्रयत्नांनी सदर रुग्णाला वाचवण्यात यश आले.
या पार्श्वभूमीवर राजावाडी रुग्णालयात जाऊन शिव आरोग्य सेनेचे ठाणे जिल्हा सह समन्वयक एकनाथ अहिरे, ठाणे जिल्हा आरोग्य संघटक डॉ. प्रशांत भुईंबर, ठाणे जिल्हा आरोग्य सह संघटक राजेंद्र शिंदे, कळवा-मुंब्राचे आरोग्य सह सचिव उल्हास शिवणेकर यांनी सर्व डॉक्टर आणि परिचारिकांचे आभार मानले.