केळवली धबधब्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला

तालुक्यातील केळवली धबधब्यात बुडालेल्या कराडच्या युवकाचा मृतदेह तब्बल अकरा दिवसांच्या शोधमोहिमेनंतर अखेर आज धबधब्यापासून चार किलोमीटर अंतरावर खोल दरीत सापडला. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या पुढाकारातून आठ तास अविश्रांत धडपड करून मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. ऋषिकेश रमेश कांबळे (कय 22, रा. सैदापूर, ता. कराड) असे मृत युवकाचे नाव आहे.

ऋषिकेश त्याच्या दोन मित्रांसोबत 30 जून रोजी केळवली धबधबा पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी ऋषिकेश धबधब्याच्या पाण्यात उतरला. मात्र, पोहताना धबधब्याच्या पाण्याच्या मुख्य प्रवाहात आल्याने तो बुडाला, असे त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले. यानंतर ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला. मात्र, परळी खोऱयात असलेली पावसाची संततधार आणि केळवली धबधब्याने घेतलेल्या रौद्ररूपामुळे शोधमोहिमेत मोठय़ा अडचणी येत होत्या.

शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने या परिस्थितीवर मात करत संपूर्ण धबधबा परिसरात शोध घेतला. बुधकारी सायंकाळी धबधब्यापासून चार किलोमीटर अंतरावर खोल दरीत मृतदेह असल्याचा अंदाज आला होता. रात्रीची शोधमोहीम शक्य नसल्याने शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने आज सकाळी आठ वाजेपासून शोधकार्य सुरू केले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाबरोबर मृतदेह वाहून येताना मोठमोठे दगड वाहून येत मृतदेहावर पडले होते. त्यामुळे रेस्क्यू करण्यात अडचणी येत होत्या. तब्बल 8 तासांच्या शोधकार्यानंतर दरीमधून मृतदेह काढण्यात यश आले.

प्रतिकूल परिस्थितीत 11 दिवस राबवले ऑपरेशन

z केळवली धबधब्यात बुडालेल्या ऋषिकेश कांबळे या युवकाचा शोध घेण्यासाठी छत्रपती शिकेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. केळकली धबधब्यापासून ते अगदी उरमोडी धरण पात्रात बोटिंग करीत या टीमने शोध मोहीम राबविली. मुसळधार पाऊस, कादळ, कारा, त्या परिसरात जाण्यासाठी कराकी लागणारी पायपीट, कोणत्याही सोयीसुकिधा नाहीत, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये टीमने तब्बल अकरा दिकस रेस्क्यू ऑपरेशन सुरू ठेकले होते.