अलीकडच्या काळात शहरी भागातील लोक रोख व्यवहारांपेक्षा डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत आहेत. अगदी चहाच्या टपरीपासून भाजी खरेदी अशा लहानमोठय़ा सगळ्या व्यवहारात डिजिटल पेमेंट केले जातेय.
ऑनलाईन खरेदी करताना 90 टक्के लोक डिजिटल पेमेंट करणे पसंत करतात. छोटय़ा शहरांमध्ये 65 टक्के व्यवहार डिजिटल माध्यमातून होताहेत. शहरांचा विचार केला तर 75 टक्के व्यवहार डिजिटलच्या माध्यमातून होतात. कियर्नी इंडिया आणि अॅमेझॉन पे इंडियाच्या अहवालातून ही माहिती समोर आलेय. ऑफलाईन खरेदीमध्येही लोक डिजिटल पेमेंटचा भरपूर वापर करू लागले आहेत.