उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला जात असाल तर थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये (भूस्खलन) प्रचंड वाढ झाली आहे. राज्यात मान्सून सक्रिय झाला असून तेव्हापासून आतापर्यंत 1521 वेळा भूस्खलन झाले आहे. यामुळे रस्ते बंद झाले. 217 अजूनही बंद आहेत. स्टेट लँडस्लाइड मिटिगेशन आणि मॅनेजमेंट सेंटरने 132 ठिकाणे ओळखली आहेत जिथे डोंगराला सर्वाधिक तडे गेले. यातील बहुतांश चारधाम यात्रा मार्गावर आहेत. याशिवाय 35 नवीन भूस्खलन झोनही सापडले आहेत. हिमाचलच्या तुलनेत उत्तराखंडमध्ये भूस्खलन जास्त होतात. कारण संपूर्ण हिमालय पर्वतरांगातील सर्वात कमकुवत पर्वत उत्तराखंडमध्ये आहेत. त्यामुळेच उत्तराखंडमध्ये भूस्खलनाच्या घटना वारंवार घडत आहेत.