NIPER JEE 2024 : दापोलीच्या कन्येची गगनभरारी, JEE परिक्षेत वैदेहीने पटकावला देशात 21 वा क्रमांक

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या वैदेही विवेकानंद खेडेकर हिने NIPER JEE परीक्षा उत्तीर्ण करत दापोली तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. NIPER JEE या परीक्षेत वैदेहीने राष्ट्रीय स्तरावर 21 वा क्रमांक पटकवला, तर GPAT परीक्षेमध्ये 1217 ही ऑल इंडिया रॅकिंग प्राप्त केली.

दापोली तालुक्यातील भडवळे गावच्या वैदेही खेडेकर या विद्यार्थीने NIPER JEE ही अवघड प्रवेश परीक्ष उत्तीर्ण केली आहे. प्रचंड मेहनतीच्या जोरावर वैदेहीने NIPER JEE परीक्षेत देशामध्ये 21 वा क्रमांक, तर GPAT परीक्षेमध्ये 1217 वा क्रमांक पटकावला. तिच्या या घवघवीत यशामुळे पंचक्रोशीत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. NIPER JEE ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर ओषध निर्माणशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश दिला जातो. वैदेहीने ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे पंजाब राज्यातील मोहाली येथील NIPER या अत्यंत प्रतिष्ठीत महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे.