ब्रिटनमध्ये मोठी उलटफेर झाली आणि तब्बल 14 वर्षानंतर लेबर म्हणजेच मजूर पार्टीने ऋषी सुनक यांच्या कंझर्वेटिव्ह म्हणजेच हुजुर पक्षाचा पराभव केला. त्यानंतर ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी हिंदुस्थानी वंशाच्या नवनिर्वाचित खासदाराने श्रीमद भगवद्गीता आणि बायबलवर हात ठेऊन शपथ घेतली.
मजूर पक्ष सार्वत्रिक निवडणुकीत 400 हून अधिक जागांवर विजय मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आणि तब्बल 14 वर्षानंतर हुजुर पक्षाचा पराभव झाला. त्यामुळे मजूर पक्षाचे कीर स्टार्मर (61 वय) देशाचे 58 वे पंतप्रधान बनणार आहेत. या निवडणुकीमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या 29 सदस्यांचा विजय झाला. यापैकी शिवानी राजा यांनी भगवद्गीतेवर हात ठेवत शपथ घेतली होती. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतं पहिल्यांदा खासदार झालेल्या कनिष्क नारायण यांनी सुद्धा बायबल आणि भगवद्गीतेवर हात ठेऊन शपथ घेतली. कनिष्क नारायण लेबर पार्टीकडून वेल ऑफ ग्लॅमरगनमधून निवडणूक जिंकले आहेत. तसेच माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी सुद्धा यावेळी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.