NEET पेपर लीक प्रकरण केंद्र पातळीवरचे, सोशल मीडियावर काही पडले नाही; CBI ची न्यायालयात माहिती – सूत्र

NEET-UG 2024 पेपर फुटी प्रकरण व्यापक नसून ‘स्थानिक पातळीवरील’ आहे, अशी माहिती केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने सर्वोच्च न्यायालयाकडे दिली आहे अशी शक्यता असल्याचं इंडिया टुडेच्या विशेष वृत्तात म्हटलं आहे. सूत्रांच्या आधारे हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सीबीआयने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सीलबंद कव्हरमध्ये सादर केलेल्या Status Report (स्थिती अहवाल) सादर केला आहे. या अहवालामध्ये वरील माहिती सादर केल्याची शक्यता या वृत्तात देण्यात आली आहे.

CBI ने आपल्या अहवालात म्हटले आहे की पेपर फुटीचे प्रकरण बिहारमधील एका परीक्षा केंद्रापुरता मर्यादित होतं आणि केवळ काही विद्यार्थी यातून प्रभावित झाले आहेत, असं सूत्रांनी सांगितलं.

फुटलेला पेपर ऑनलाइन माध्यमांवर टाकला गेल्याच्या पूर्वीच्या आरोपांचे खंडन त्यांनी खंडन केल्याचं कळतं आहे. CBI ने असं नमूद केल्याचं कळतं आहे की फुटलेला पेपर सोशल मीडियावर प्रसारित केला गेला नाही.

तपास यंत्रणेचे निष्कर्ष पेपर फुटी प्रकरणाची व्याप्ती आणि परीक्षेवर त्याचा परिणाम स्पष्ट करतील.

CBI चे सादरीकरण केंद्राच्या भूमिकेशी सुसंगत आहे, ज्यात 5 मे रोजी प्रवेश परीक्षेला बसलेल्या 23 लाख विद्यार्थ्यांसाठी पूर्ण NEET-UG पुनर्परीक्षा घेण्यास विरोध केला आहे.

केंद्राने सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, परीक्षेत ‘सामुहिक गैरव्यवहार’ झाल्याचे कोणतेही संकेत नाहीत.

वेगळ्या प्रतिज्ञापत्रात, NEET-UG परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) म्हटले आहे की, सोशल मीडिया ॲप टेलिग्रामवर फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचे फोटो दाखवणारे व्हायरल व्हिडीओ बनावट होते.

NEET परीक्षा आणि निकाल हाताळल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून टीका होत असलेल्या NTA ने सांगितले की त्यांनी राष्ट्रीय, राज्य, शहर आणि केंद्र स्तरावर NEET परीक्षेतील गुणांच्या वितरणाचे विश्लेषण केले आहे.

‘हे विश्लेषण असे दर्शवते की गुणांचे वितरण अगदी सामान्य आहे आणि गुणांच्या वितरणावर प्रभाव पाडणारा कोणताही बाह्य घटक दिसत नाही’, NTA ने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.