एलियन्सच्या शोधासाठी दुर्बीण

परग्रहावर असलेले जीव म्हणजे एलियन्स. त्यांच्याबाबत जाणून घेण्यास आपल्याला कुतूहल वाटते. गेल्या कित्येक दशकांपासून एलियन्सवर नासाचेही लक्ष आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी नासाने दुर्बीण तयार केलेय. एलियन हंटिंग दुर्बीण असे तिचे नाव आहे.  2050 सालापर्यंत परग्रहावर, जिथे एलियन्सचे वास्तव्य आहे, अशा ग्रहांचे संपूर्ण संशोधन करण्याचे नासाचे लक्ष्य आहे. एलियन्स हंटिंग दुर्बीण तयार केल्यामुळे नासाच्या एलियन्ससंदर्भातील संशोधनाला चालना मिळणार आहे, असे नासाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. जेसी क्रिस्टियनसेन यांनी सांगितले.