अमेरिकेत दिसणार राममंदिराची झलक

हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ‘इंडिया परेड डे’ साजरा होणार आहे. न्यूयॉर्कमध्ये 18 ऑगस्ट रोजी परेड होणार असून त्यामध्ये राममंदिराची झलक पाहायला मिळेल. परेडमध्ये राममंदिराच्या प्रतिकृतीचे दर्शन होईल. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी प्रमुख पाहुणे असतील. न्यूयॉर्क शहरातील मॅडिसन अॅव्हेन्यू येथून परेडला सुरुवात होईल. त्यामध्ये हजारो हिंदुस्थानी सहभागी होतील.  अमेरिकेत  दरवर्षी ‘इंडिया परेड डे’चे आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशनच्या वतीने केले जाते.