Nagar: 24 तासात बदलले आयुक्त; यशवंत डांगे महापालिकेचे नवे आयुक्त

नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी 24 तासापूर्वी झालेली बदली प्रक्रिया रद्द करून आता नव्याने पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची नगर महानगरपालिकेचे आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून त्याबाबतचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत.

नगर महानगरपालिकेमध्ये आयुक्त पंकज जावळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते दोन दिवसापूर्वी राज्य शासनाने अमरावतीचे आयुक्त देविदास पवार यांची नगर येथे नियुक्ती करण्यात आली होती. या विषयाला 24 तास उलटले नाही तोच आता राज्य सरकारने नव्याने बदलीची प्रक्रिया केली आहे. या पदावर पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती केली आहे.

या अगोदर डांगे यांनी नगर महानगरपालिकेमध्ये दोन वर्ष उपायुक्त पदाचा पदभार पाहिला होता. त्यामुळे त्यांना नगरच्या प्रश्नांची जाण आणि अनुभव आहे. आता त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ते लवकरच पदभार स्वीकारतील.