लाचखोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

bribe

महिलेकडून पैसे वसूल करून देतो असे सांगत एका व्यक्तीकडून एक लाखाची लाच घेणारे टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दीपक बागूल यांना एसीबीच्या पथकाने सोमवारी पकडले. बागूल 35 हजार रुपये घेताना रंगेहाथ सापडल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पैसे दुप्पट करण्यासाठी एका व्यक्तीने त्याच्या ओळखीतल्या महिलेला 27 लाख 50 हजार रुपये दिले होते. परंतु महिला रक्कम दुप्पट करून देऊ शकली नाही. महिलेने त्यांना 10 लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित 17 लाख 50 हजार रुपये परत देण्यास ती टाळाटाळ करू लागली. त्यामुळे त्या व्यक्तीने पत्नीसह पंतसंस्थेचे कार्यालय गाठले. तरीही महिला पैसे देत नव्हती.