![agniveer](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/agniveer-696x447.jpg)
‘अग्निवीर’ योजनेसाठी सैन्यदलाने सरकारकडे काही शिफारसी केल्या आहेत. अग्निवीराला वीरमरण आले तर त्यांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी पेंशनसारखी मदत मिळावी तसेच 50 टक्के अग्निवीरांना सैन्यात कायम करावे, अशा मागण्या सैन्यदलाने केल्या. मात्र अग्निवीरांचा चार वर्षांचा कार्यकाळ वाढवण्याची कोणतीही शिफारस सैन्यदलाने केली नसल्याचे समजते.
सध्या अग्निवीर योजनेत 25 टक्के अग्निवीरांना नोकरीत कायम करण्याची तरतूद आहे. ही तरतूद 50 टक्केपर्यंत वाढवण्याची मागणी सैन्यदलाने केली आहे. यासंदर्भात सैन्यदलाने चार महिने अंतर्गत सर्वेक्षण केले. अलीकडेच या सर्वेक्षणाची माहिती आणि त्यावर आधारित शिफारसी सैन्यदलाने डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स (डीएमए) यांच्याकडे पाठवल्या. त्यामध्ये वीरमरण आलेल्या अग्निवीरांच्या कुटुंबीयांना जीवन निर्वाह भत्ता देण्याची शिफारस आहे.