26 जेट विमाने खरेदीसाठी हिंदुस्थानच्या वाटाघाटी; राफेल मरिन जेट करार, फ्रान्सशी चर्चेची दुसरी फेरी सुरू

26 राफेल सागरी विमाने खरेदी करण्यासाठी हिंदुस्थान फ्रान्ससोबत वाटाघाटी करत आहे. राफेल मरिन जेट करार-फ्रान्सशी चर्चेची दुसरी फेरी सुरू आहे. या कराराची किंमत 50 हजार कोटींहून अधिक असणे अपेक्षित आहे. फ्रेंच शिष्टमंडळासोबत हिंदुस्थानच्या चर्चेची दुसरी फेरी 8 जुलैपासून सुरू झाली असून पुढील 10 ते 12 दिवस अशीच स्थिती राहण्याची शक्यता वर्तवली आहे. 2016 मध्ये हवाई दलासाठी 36 विमानांसाठी पूर्वीचा करार वापरून नौदलासाठी राफेल-एम कराराची मूळ किंमत समान ठेवू इच्छित आहे. 26 राफेल-एम लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या करारावरील चर्चेची पहिली फेरी गेल्या महिन्यात सुरू झाली. त्यानंतर फ्रान्स सरकार आणि डसॉल्ट पंपनीच्या अधिकाऱयांनी संरक्षण मंत्रालयाच्या कॉन्ट्रक्ट निगोशिएशन कमिटीशी चर्चा केली होती. हा करार निश्चित झाल्यास फ्रान्स राफेल-एम जेटसह शस्त्र, सिम्युलेटर, क्रूसाठी प्रशिक्षण आणि लॉजिस्टिक सपोर्टदेखील देईल.

फ्रेंच ऑफरमध्ये लढाऊ विमानांवर भारतीय शस्त्रs एकत्रित करण्यासाठी पॅकेजचा समावेश आहे. या शस्त्रांमध्ये हवेतून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र, हिंदुस्थानी विशिष्ट उन्नत लँडिंग उपकरणे आणि विमानवाहू जहाजांवरून ऑपरेट करण्यासाठी जेटमधील आवश्यक उपकरणे यांचा समावेश आहे. फ्रान्सने चाचण्यांदरम्यान हिंदुस्थानी विमानवाहू युद्धनौकांकडून राफेल विमानाचे लँडिंग आणि टेक-ऑफ काwशल्य दाखवले आहे.

– 22 सिंगल सीट राफेल-एम जेट्स आणि 4 डबल ट्रेनर सीट राफेल-एम जेट्स नौदलासाठी खरेदी केली जात आहेत. हिंद महासागरात चीनचा मुकाबला करण्यासाठी आयएनएस विक्रांतवर तैनात केली जातील. भारतीय नौदल ही विमाने विशाखापट्टणम, आंध्र प्रदेशातील आयएनएस देगा येथे त्यांचा होम बेस म्हणून तैनात करणार आहे. राफेल मरिन हे हिंदुस्थानातील राफेल लढाऊ विमानापेक्षा अधिक प्रगत आहे. त्याचे इंजिन अधिक शक्तिशाली आहे. त्यामुळे ते आयएनएस विक्रांत या लढाऊ विमानावरून स्की जंप करू शकते.