स्पाईसजेट आर्थिक अडचणीत; ईपीएफओने बजावली नोटीस

दोन वर्षे कर्मचाऱ्यांच्या पीएफचे पैसे भरले नाहीत, ईपीएफओने बजावली नोटीस. देशातील आघाडीची विमानसेवा कंपनी स्पाईसजेट आर्थिक अडचणीत आहे. स्पाईसजेटकडे कर्मचाऱ्यांचा पीएफ भरायलाही पैसे नाहीत. मागील अडीच वर्षांपासून कंपनीने पीएफची रक्कम थकवली आहे.

स्पाईजजेटने जानेवारी 2022 मध्ये 11 हजार 581 कर्मचाऱयांचा पीएफ भरला होता. त्यानंतर कंपनीने पीएफचे पैसे भरलेले नाहीत. याप्रकरणी ईपीएफओने पंपनीला नोटीस बजावली आहे. स्पाईज जेट आर्थिक अडचणीत आहे. याचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवरही झाला. या वर्षी 1 जानेवारीपासून स्पाईसजेटचे शेअर 7.62 टक्क्यांनी घसरले. मात्र वर्षभरात शेअरने 85.99 टक्क्यांचा रिटर्न दिला आहे. कलानिधी मारन आणि त्यांच्या केएएल एअरवेजने स्पाईस जेटमधील त्याचा 58.64 टक्के हिस्सा अजय सिंगला हस्तांतरित केला होता. सुमारे 1500 कोटींचा रुपयांचा हा सौदा होता. केएएल एअरवेज आणि मारन यांनी स्पाईस जेट आणि अजय सिंग यांच्याकडे 1323 कोटी रुपयांच्या नुकसानीची मागणी केलेली आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे.