भाईंदर रेल्वे स्थानकात वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याचे घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. यात वडील आणि मुलगा रेल्वेच्या समोर आडवे होताना दिसतात. अचानक लोकलसमोर दोघेही आल्याने लोकोपायलटने प्रयत्न करूनही लोकल थांबवता आली नाही. आत्महत्या केलेले दोघेही नालासोपारा येथे राहत होते.
याबाबत मिळालेली माहिती असी की, भाईंदर रेल्वे स्थानकातून वडील आणि मुलाने आत्महत्या केल्याचे हृदय पिळवटून टाकणारे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेत वडील आणि मुलगा प्लॅटफॉर्मवर एकमेकांशी बोलत विरारच्या दिशेने जाताना दिसत आहेत. प्लॅटफॉर्मवरून उतरून काही अंतर चालून गेल्यावर दोघे पिता-पुत्र विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनसमोर आडवे झाले.
मुलाचे नाव जय मेहता असं असून तो 22 वर्षांचा होता. या प्रकरणी वसई पोलिसात नोंद झाली असून तपास सुरू आहे. रेल्वे भाईंदर स्टेशनमधून निघताच दोघांनीही ट्रॅकवर झोकून दिलं. दोघांच्या अंगावरून लोकल गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. तसंच त्यांच्याकडे सुसाईड नोटही आढळलेली नाही. मात्र रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती-पत्नी आणि सासरच्या लोकांच्या वादातून हा प्रकार घडला आहे.
अचानक लोकल ट्रेनसमोर दोन जण येताना पाहून ट्रेनच्या ड्रायव्हरने लोकल ट्रेन थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ट्रेन थांबली तोपर्यंत दोघेही ट्रेनखाली आले. घटनेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेले दोघेही पिता-पुत्र असून ते नालासोपारा येथील रहिवासी होते. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी एडीआरशिवाय गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.