सरमळे येथे पुरात अडकलेल्या व्यक्तीला जीवदान

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ओटवणे नदीने धोक्याची पातळी गाठली. सरमळे परिसरात रस्त्यावर आलेल्या पाण्यात नांगरतास येथील एक व्यक्ती बुडत असताना युवकांच्या प्रसंगवधानाने मोठी दुर्घटना टळली.ही घटना उशिरा अंधार पडण्याच्या वेळेस घडली. एक व्यक्ती पाण्यात बुडत असल्याचे दूर वरून सरमळे येथील विश्वजीत गावडे आणि संजय सावंत यांनी पाहताच स्वतः च्या जीवाची पर्वा न करता त्या पुराच्या पाण्यात उतरत त्या बुडत असणाऱ्या माणसापर्यंत पोचत त्याला सुरक्षित बाहेर काढले.