
जगभरात ऑनलाइन डेटिंग अॅप्सचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. जोडीदार शोधण्यासाठी हजारो तरुणाई या अॅप्सचा वापर करत आहे. परंतु अॅप्सवर जास्त वेळ घालवल्यामुळे 80 टक्के यूजर्स हे थकवा, निराशा आणि एकटेपणाचा सामना करत आहेत, अशी माहिती एका अमेरिकेत केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे.
डेटिंग अॅप्सच्या सततच्या वापरामुळे युजर्सची नातेसंबंधातील रुची कमी होत आहे. डेटिंग अॅप्सच्या जास्त आणि सतत वापरामुळे अमेरिकेत मानसिक थकवा व एकटेपणाचा अनुभव वाढणे गंभीर मुद्दा होत आहे. दर 10 पैकी 8 लोकांना मानसिक थकवा जाणवणे चिंतेचा विषय आहे, असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.