अरुण गवळीविरोधातील खटल्यातील फाईल गहाळ!

 गँगस्टर अरुण गवळीविरोधातील खंडणीच्या प्रकरणात ‘मोक्का’ कायद्यांतर्गत कठोर तरतुदी लागू करण्यासंबंधीची कागदपत्रे गहाळ झाली आहेत. संबंधित कागदपत्रे सापडत नसल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांनी विशेष ‘मोक्का’ न्यायालयाला दिली आहे. 2005 मध्ये गवळी व त्याच्या टोळीतील इतर सदस्यांविरुद्ध खंडणी तसेच मुंबई, ठाणे व कल्याणमधील मालमत्ता बळकावण्यासाठी धमकावणे या आरोपांखाली गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गवळीच्या वकिलांनी उलटतपासणीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी काही कागदपत्रे गहाळ असल्याचे उघडकीस आले. न्यायालयाने पोलिसांना कागदपत्रे शोधण्यासाठी 15 दिवसांचा वेळ दिला होता. त्या अवधीतही कागदपत्रे सापडू शकली नाहीत.