#MumbaiRains मुंबई-ठाण्याला पावसानं झोडपलं; रेल्वे रुळांवर पाणी भरलं, अप-डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत

mumbai rains bhandup station

गेल्या काही दिवसांपासून मुंबईला चागंल्या पावसाची प्रतिक्षा होती. अखेर रविवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. सोमवारची पहाटे उजाडेपर्यंत पावसानं चांगलाच जोर धरला आणि मुसळधार संततधार पावसानं मुंबईच्या सखल भागात पाणी साठण्यास सुरुवात झाली. मुंबईचे अनेक रस्ते जलमय झाले तर रेल्वे रुळांवर पाणी भरल्यानं लोकल वाहतुकीवर त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे वाहतुकीला पावसाचा चांगला फटका बसला असून अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या काही लोकल गाड्या या ठाणे स्टेशनपर्यंतच चालवण्यात येत आहेत. अनेक रेल्वे स्टेशनवर तिकीट कार्यालय देखील बंद ठेवण्यात आली असून स्टेशनवर तशा सूचना देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर मात्र गाड्यांची वाहतूक सुरू असून काही मिनिटे उशिरानं वाहतूक सुरू असल्याचं कळत आहे.