कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी लढताना लष्कराचे कमांडो प्रदीप नैन शहीद झाले. हरयाणातील जींदचे ते रहिवासी होते. प्रदीप आईवडिलांचे एकुलते एक असून त्यांची पत्नी गरोदर आहे. दोनच वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना वीरमरण आल्याची बातमी गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. पत्नी आणि आईवडील मोठय़ा धक्क्यात आहेत.
प्रदीप 2015 मध्ये लष्करात कमांडो म्हणून रुजू झाले. 2022 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. दहशतवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या प्रदीप यांचे पार्थिव आज गावात आणण्यात येणार आहे. प्रदीप यांच्या कुटुंबात त्यांचे आईवडील आणि पत्नी यांचा समावेश आहे. प्रदीप शहीद झाल्याचे वृत्त कळताच पत्नीची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयाच्या 27 व्या वर्षी प्रदीप यांना वीरमरण आले.