गरोदर पत्नी व वृद्ध आईवडीलांना मागे सोडून गेले शहीद प्रदीप नैन, मूळ गावी होणार अंत्यसंस्कार

जम्मू-काश्मीरमधून दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांची दहशतवादी विरोधी कारवाई सुरु आहे. शनिवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र दहशतवाद्यांशी लढताना आपले दोन जवान शहीद झाले. त्यापैकी एक होते ते कमांडो प्रदीप नैन.

प्रदीप नैन हे हरियाणातील जींद गावचे रहिवासी होते. 2015 मध्ये लष्करात कमांडो म्हणून रूजू झाले. 2022 रोजी त्यांचे लग्न झाले. प्रदीप यांचे पार्थिव रविवारी गावात आणण्यात येणार आहे.प्रदीप यांच्या पश्चात आई-वडील आणि पत्नी असा परिवार आहे. पत्नी गर्भवती असून प्रदीप यांच्या बातमीने त्यांना धक्का बसला आहे. त्यांची प्रकृती खालवली आहे. संपूर्ण जिंद गावावर शोककळा पसरली आहे. वयाच्या 27व्या वर्षी प्रदीप शहीद झाले आहेत. सुरक्षा दलाशी मोदरगावात झालेल्य़ा चकमकीत पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप नैन हे शहीद झाले.