मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, मध्य रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी असून मध्य रेल्वेवरील आजचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. दिवा ते ठाणे दरम्यान सकाळी 10.50 ते दुपारी 3.30 या काळात हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार होता. मात्र वासिंदमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे हा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने ट्विट करून ही माहिती दिली.

वासिंद रेल्वे स्थानकाजवळ ओव्हर हेड वायरचा पोल खचल्याने रेल्वेला होणारा वीज पुरवठा खंडीत झाला. परिणामी वासिंदहून कसाराकडे जाणारी व कसाराहून मुंबईकडे येणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद झाल्याची उद्घोषणा रेल्वेकडून करण्यात येत होती.