केंद्र सरकारचे विद्युत स्मार्ट मीटर धोरण म्हणजे एकप्रकारे सर्वसामान्यांची पिळवणूक आहे. ही योजना म्हणजे लोकविरोधी आणि लोकांना आर्थिक संकटात टाकणारी आहे. वीज ग्राहकांवर होऊ घातलेल्या या संकटाविरोधात जनजागृती करण्यासाठी विद्युत स्मार्ट मीटर विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली उद्या, 7 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता दादर पूर्व येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सभागृहात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
या सभेत केंद्र सरकारचे विद्युत स्मार्ट मीटर धोरण तसेच वीज ग्राहकांवर होऊ घातलेले आर्थिक संकट आणि इतर गंभीर समस्या याबाबत माजी महापौर निर्मला सामंत-प्रभावळकर, मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड, बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत, अपघात निवारण समितीचे माजी सदस्य हर्षद स्वार आणि कामगार एकता कमिटीचे गिरीश आदी तज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.