रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार, 7 जुलै रोजी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही गाडय़ा उशिराने धावतील तर काही गाडय़ा रद्द केल्या जातील. पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12.15 ते पहाटे 4.15 वाजेपर्यंत वसई रोड ते विरारदरम्यान ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे या मार्गावर दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार नाही. मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील गाडय़ा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. काही गाडय़ा उशिराने धावतील तर काही गाडय़ा रद्द केल्या जातील. तसेच 18 अप-डाऊन मेल-एक्स्प्रेस उशिराने धावतील. हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक जाहीर केला आहे.