पक्षात मीच योग्य उमेदवार

अमेरिकेत होणाऱया राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी होणाऱया पहिल्याच अध्यक्षीय चर्चेत ट्रम्प यांच्याकडून पराभव झाल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षात बायडेन यांना शर्यतीतून बाहेर काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परंतु, डेमोक्रॅटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्ष पदासाठी मीच योग्य उमेदवार आहे. पक्षात माझ्यापेक्षा वरिष्ठ कोणी नाही. जोपर्यंत देव स्वतः अवतरून मला उमेदवारी सोडण्यास सांगत नाही, तोपर्यंत मी माझी उमेदवारी सोडणार नाही, अशा शब्दांत जो बायडेन यांनी आपणच उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहे, हे दाखवून दिले आहे. अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी होणाऱया राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 4 महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक आहे. त्याआधी, डेमोक्रॅटिक पक्षाकडून दुसऱयांदा निवडणूक लढवलेले जो बायडेन यांच्याविरोधात आवाज उठू लागला आहे.