Budget 2024 : मोदी सरकारची पुन्हा परीक्षा! 23 जुलैला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवीन सरकार सत्तेत आल्यावर संसदेचे पावसाळी अधिवेशन झाले. या अधिवेशनात विरोधी पक्षांनी नीट पेपरफुटी आणि मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यांसह इतर मुद्द्यांवरून घेरले. आता संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची तारीख झाली आहे. येत्या 23 जुलैला संसदेत अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

18 व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन संपलं. या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाला. तसेचे लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केले. आता सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लागले आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून अधिवेशनाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना 2024-25 चा अर्थसंकल्प 23 जुलै रोजी लोकसभेत मांडतील.