न्याय मिळवायचा असेल तर मराठ्यांनो, घराबाहेर पडा! मनोज जरांगे यांचे समाजबांधवांना आवाहन

मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅलीचा प्रारंभ शनिवारी हिंगोलीतून होणार आहे. न्याय मिळवायचा असेल तर मराठ्यांनो, घराबाहेर पडा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. ही रॅली म्हणजे शक्तिप्रदर्शन नसून हा मराठा समाजाचा आरक्षणासाठी पुकारलेला एल्गार असल्याचेही जरांगे म्हणाले. सरकारने आरक्षण दिले नाही, तर आपल्याला आरक्षण देणारे बनावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

आंतरवाली येथे मनोज जरांगे पत्रकारांशी बोलत होते. आरक्षणाच्या न्याय्य मागणीसाठी आंदोलन करण्याचा अधिकार कायद्याने आम्हाला दिला आहे. या रॅलीमुळे ओबीसी नेत्यांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शांतता रॅलीत घुसखोरी करून गालबोट लावण्याचा प्रयत्न होईल, अशी भीतीही जरांगे यांनी व्यक्त केली.