सिल्लोडमधील 3400 रेशनकार्डधारकांबाबत महिनाभरात निर्णय, शिवसेनेच्या मागणीला यश

छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील 3400 रेशनकार्डधारकांबाबत योग्य कार्यवाही करून एका महिनाभरात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सिल्लोडमधील अन्न सुरक्षा योजनेंतर्गत लाभार्थ्यांना शासनाकडून लाभ मिळत नसल्याचा तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

सिल्लोड तालुक्यातील 8 हजार 921 शेतकरी लाभार्थ्यांच्या कार्डची छाननी केली आहे. त्यापैकी 1995 रेशनकार्डधारकांना अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे. यातील 1503 रेशनकार्डधारकांना धान्याची मागणी केली आहे. त्याप्रमाणे त्यांना धान्य वितरण करण्यात येत आहे. डीबीटीमध्ये पात्र असलेली 2285 रेशनकार्डधारक आहेत, असे भुजबळ यांनी सांगितले. तसेच जे शेतकरी कोणत्याच निकषात बसत नाहीत, असे 124 कार्डधारक आहेत. अशातच काही ना काही त्रुटी असलेले 3400 रेशनकार्डधारक आहेत. याबाबत कार्यवाही पूर्ण करून एक महिन्यात निर्णय घेण्यात येईल, असे भुजबळ म्हणाले.