पात्र फेरीवाल्यांना हटवल्यास कारवाई होणार

सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व्हेनुसार जे फेरीवाले पात्र ठरलेले आहेत, त्यांना कोणीही हटवू शकत नाही. जर त्या पात्र फेरीवाल्यांना हटवले जात असेल, तर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देऊ, असा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज विधानसभेत दिला.

काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी फेरीवाल्यांवरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबईसह राज्यातील इतर शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पावसाळा सुरू असताना त्यांच्यावर कारवाई केली जाते हे अन्यायकारक आहे, असे पटोले म्हणाले. 30 लाख कुटुंबांचा हा प्रश्न असून पेंद्र सरकारप्रमाणे राज्यात जोपर्यंत फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही कारवाई थांबवण्याचे निर्देश सरकारला द्यावेत, अशी विनंती त्यांनी केली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन येत्या मंगळवारी या मुद्दय़ावर चर्चा करू, असे नार्वेकर यांनी सांगितले.