
मिंधे-भाजप सरकारच्या कार्यकाळात एकामागून एक घोटाळे बाहेर येत असताना आता उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या नागपूरमध्ये अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईसाठी मिळालेले लाखो रुपये सरकारी बाबूंनी शेतकऱयांच्या बोगस नावांनी लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घोटाळय़ाची पोलखोल आज सभागृहात केली.
नागपूरमध्ये 2022-23 या वित्तीय वर्षात झालेल्या अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीसाठी मदत म्हणून राज्य शासनाने शेतकऱयांना प्रतिहेक्टर 13 हजार 600 रुपये मदत घोषित केली होती, मात्र नागपूर जिह्यातील कुही तालुक्यात महसूल अधिकाऱयांनी व कर्मचाऱयांनी बोगस शेतकऱयांची नावे शासनाला सादर करत अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे पैसे परस्पर बोगस शेतकऱयांच्या नावे वळते केल्याचे शासकीय कागदपत्रांवरूनच सिद्ध झाले आहे. यासाठी मूळ शेतकऱयाचा खसरा क्रमांकाचा वापर करण्यात आला असून लाभार्थी शेतकऱयाच्या खसरा क्रमांकावर बोगस शेतकऱयांचे नाव देण्यात आले व बोगस शेतकऱयांच्या बँक खात्यात अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचे पैसे वळवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे जिह्याच्या नियोजन मंडळातील भाजपच्याच एका कार्यकर्त्यांने माहिती अधिकारातून ही विश्वसनीय माहिती मिळवून घोटाळा उघड कsला आहे. शिवाय या घोटाळय़ाची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱयांकडून घोटाळय़ाचे पैसे वसूल करा, अन्यथा आंदोलन करू असा इशाराही संबंधित कार्यकर्त्याने दिला आहे.
निम्म्या प्रकरणांमध्ये घोटाळा
कुही तालुक्यातील घोटाळय़ात तब्बल निम्मी प्रकरणे बोगस आहेत. या प्रकरणात तलाठय़ापासून ते थेट तहसीलदारापर्यंत अडकले असल्याचा आरोपही दानवे यांनी कsला. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशी मागणीही त्यांनी कsली. यावेळी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संबंधित प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.
अधिकाऱयांनी खसरावर शेतकऱयांचे नाव आणि 7/12 वर नाव बदलून बोगस नावे टाकून शेतकऱयांचे अनुदान लाटण्यात आले. शेतकऱयांचे अनुदान लाटण्याचे पाप अधिकाऱयांनी केले. पुंपणच शेत खात असेल तर दुर्दैव आहे.
अंबादास दानवे, विरोधी पक्षनेता, विधान परिषद