भाजप सरकारने आणलेली अग्निवीर योजना सुरुवातीपासून वादात राहिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवरून केंद्र सरकारला धारेवर धरले आहे. अग्निवीर योजनेचा मुद्दा तापलेला असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली. आग्रा येथील एअरफोर्स स्टेशनवर तैनात असलेल्या एका अग्निवीराने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या तरुणाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आले नाही. परंतु या घटनेने कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे. आत्महत्या केलेल्या अग्निवीराचे नाव श्रीकांत चौधरी (22) असे असून त्याने एअरफोर्स स्टेशन कॉम्प्लेक्समध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडली. श्रीकांत हा बलिया येथील रहिवासी होता. दीड वर्षापूर्वीच तो अग्निवीर म्हणून भरती झाला होता.