चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील जिल्हाप्रमुख जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिह्यातील जिल्हाप्रमुखांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

जिल्हाप्रमुख पुढीलप्रमाणे – संदीप गिऱहे (बल्लारपूर विधानसभा, चंद्रपूर विधानसभा), रवींद्र शिंदे (भद्रावती – वरोरा आणि राजूरा विधानसभा), मुकेश जीवतोडे (ब्रह्मपुरी विधानसभा आणि चिमूर विधानसभा तसेच भद्रावती वरोरा विधानसभाप्रमुख).