मुंबई तोडता येत नाही म्हणून अदानींच्या घशात घालता का? आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्ला

धारावी पुनर्विकास प्रकल्पाबरोबरच मुंबईतील मोक्याच्या जमिनी मिंधे सरकारकडून उद्योगपती अदानींना कवडीमोल भावात आंदण दिल्या जात आहेत. हा मुद्दा विधिमंडळात आज गाजला. त्यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आक्रमक झाले. मुंबई तोडता येत नाही म्हणून अदानींच्या घशात घालताय का, असा घणाघात त्यांनी मिंधे सरकारवर केला.

विधान भवनाच्या आवारात आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मिंधे सरकारच्या भ्रष्ट कारभारावर हल्लाबोल केला. विरोधी पक्ष या मुद्दय़ावर सातत्याने आवाज उठवत आहे. मुंबई अदानींच्या घशात घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. धारावीचे पुनर्वसन व्हावे, लोकांना चांगली घरे मिळावीत असे आम्हालाही वाटते, पण भाजप आणि मिंध्यांचे मालक हीच जमीन नाही तर मुंबईतील इतर जमिनीही अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी मालकाला हात जोडून लोटांगणच घातले आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

चांगले काम करणाऱया पुठल्याही उद्योगपतीला आमचा विरोध नाही. पण आज ईस्ट इंडिया पंपनीपेक्षाही भयानक प्रकार हा मुंबईत आणि महाराष्ट्रात सुरू आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मुंबईत सध्या चार की पाच टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी आहेत. मुंबई महापालिकेलाच टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी करू असे महाविकास आघाडीचे स्वप्न आहे, पण धारावीमध्ये एखादी परवानगी घ्यायची असेल किंवा प्रस्तावित योजना असेल तर टाऊन प्लॅनिंग अथॉरिटी, डीआरपी, मुंबई महापालिका किंवा एमएमआरडीए यांना 15 दिवसांत अदानी समूहाला उत्तर द्यावे लागते. नाहीतर अदानी म्हणतील तसेच करावे लागते असा मिंध्यांचा कायदा आहे, असा हल्लाबोल ठाकरे यांनी केला.

मुंबईसह देशात अनेक पुनर्विकास प्रकल्प सुरू आहेत. पण कोणाला अशा सवलती मिळाल्या नाहीत. नवीन कायदा राज्यात आणि देशात कशासाठी आलेला आहे? काय नक्की आपण पुनर्विकास करतोय? चंद्रावर काम करतोय का? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. मिठागरे, डंपिंग ग्राउंड, ऑक्ट्राय नाका, पुर्ल्यातील मदर डेअरीचा प्लॉट तसेच मुलुंडमध्ये जे प्लॉट आहेत ते किती दिवस अदानी समूहाला देणार आहात, असाही जाब त्यांनी विचारला.

धारावीकरांना इतरत्र हलवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी टीका केली. वरळी बीडीडीमध्ये जिथे मोकळी मैदाने होती तिथे नवीन इमारती बांधल्या जात आहेत. नंतर जुन्या इमारती पाडून तिथे मोकळी मैदाने बनवली जात आहेत. धारावीमध्येही असे करणे शक्य आहे. तिथेही तिथल्या तिथेच ट्रान्झिट पॅम्प उभारले जाऊ शकतात, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

धारावीतील जवळपास एक लाख पुटुंबांना अपात्र ठरवण्याची भीती महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. मग नक्की विकास कोणाचा होतोय? हा विकास अदानी समूहाचा होतोय की धारावीचा? असा संतप्त सवाल करतानाच, अदानींच्या घशात जमिनी घालणारे जीआर रद्द करून मुंबईच्या हिताचे जीआर आणावेत, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली. तीन महिन्यांत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोणाचाही उलटसुलट फायदा न करू देता मुंबई आणि धारावीसह महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष पेंद्रित करू, असा ठाम विश्वासही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधानसभेतील शिवसेनेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार पैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, काँग्रेस आमदार धीरज देशमुख आदी उपस्थित होते. ‘मुंबई विकणाऱया मिंधे सरकारचा धिक्कार असो’, ‘डंपिंग ग्राऊंडचा, जकात नाक्याचा भूखंड अदानींच्या घशात घालणाऱया सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.