चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपिपरी तालुक्यात येणारं चेकबिडरी हे तसे लहानसेच गावं. मात्र सध्या गावाची सर्वत्र चर्चा होतेय. चेकबिडरी गावचे रहिवासी मोतीराम आत्राम यांच्याकडील पाळीव शेळीने नुकतेच दोन पिल्लांना जन्म दिला. यापैकी एक पिल्लू सामान्य आहे, परंतू दुसऱ्या पिल्लाचा चेहरा मानवी चेहऱ्याशी मिळता जुळता असल्याने हे पिल्लू चर्चेचा विषय ठरला. या पिल्लाचे डोळे आणि चेहरा माणसासारखा असल्याने त्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी आत्राम यांच्या घरी गर्दी केली होती.
अभ्यासकांच्या मते, अशी पिल्ले जन्माला येणे म्हणजे हा चमत्कार नसून जनुकीय बदलांचा परिणाम असल्याचे सांगितले. मात्र अशी पिल्ले फार काळ जगू शकत नाहीत. आत्राम कुटुंबीयांकडील पिल्लाने अवघ्या एका दिवसातचं जगाचा निरोप घेतला. शेळीने बुधवारी दोन वाजताच्या सुमारास दोन पिल्लांना जन्म दिला होता, आणि गुरूवारी सकाळी नऊ वाजता या अनोख्या पिल्लाचा मृत्यू झाला. पिल्लाला वाचविण्यासाठी आत्राम कुटुंबीयांनी अनेक प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वी ठरले. सध्या सोशल मीडियावर या पिल्लाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत.