महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी बुधवारी (3 जुलै) अटकपूर्वी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु आज (4 जुलै) पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने पंकज जावळे यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.
लाचखोर आयुक्त पंकज जावळे आणि लिपिक देशपांडे यांच्यावर आठ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आयुक्त डॉ. जावळे यांने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला. या प्रकरणावर आज (4 जुलै) सकाळी सुनावणी पार पडली. यावेळी आयुक्तांचे वकील ऍड.सतीश गुगळे यांनी जोरदार युक्तिवाद केला, तर फिर्यादी किरण काळे यांच्यावतीने ज्येष्ठविधीज्ञ अभिजीत पुप्पाल यांनी युक्तीवाद केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश एन.आर.नाईकवाडी यांनी आयुक्त पंकज जावळे यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळून लावला आणि पुढील सुनावणी आठ जुलै रोजी ठेवण्याचे आदेश दिले आहेत.