नगर तालुक्यातील पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटानांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. अशातच बुधवारी (03 जून) तीन व्यक्ती गावात आल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावामध्ये पसरली आणि संशयावरून तिघांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
नगर तालुक्यातील पांगरमल परिसरात गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांची जनावरे चोरी होत असल्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण होते. सदर प्रकाराबाबत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देखील दिले होते. परंतु बुधवारी (03 जुलै) पहाटे तीन व्यक्ती गावात घुसल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर गावातील सर्वांनी मिळून तिघांचा शोध घेतला आणि शेळ्या चोरल्याच्या संशयावरून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शालिका रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन सरपंच अमोल आव्हाड, उद्धव महादेव आव्हाड, आजीनाथ महादेव आव्हाज, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड आणि गावातले इतर 20 ते 25 जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.