![hathras stampede](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/hathras-stampede--696x447.jpg)
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा 122 वर गेला आहे. रुग्णालयांमध्ये आजही मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश दिसत होता. जखमींचाही आकडा दीडशेच्या पुढे असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दुर्घटनेप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले असून भोले बाबा फरार आहे. त्याचे खरे नाव सुरपाल सिंह आहे. दरम्यान, भोलेबाबांनी सत्संग स्थळ सोडल्यानंतर त्यांचा स्पर्श झालेली माती गोळा करण्यासाठी भाविकांची अक्षरशः झुंबड उडाली. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. काही भाविक जवळच्या नाल्यात पडले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज सकाळी जिल्हा रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि अधिकाऱयांकडून या संपूर्ण घटनेची माहिती घेतली. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सेवेकरी, बाबा घटनास्थळावरून पळून गेले. पोलिसांनी त्याच्या मैनपुरीतील आश्रमातही छापा घातला. दरम्यान, याप्रकरणी तब्बल 22 आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– भोलेबाबाने पत्रक काढून दुर्घटनेप्रकरणी खेद व्यक्त केला आहे. चेंगराचेंगरी होण्याआधीच तिथून निघालो होतो. चेंगराचेंगरीत मृत्यू झाला त्यांना आदरांजली वाहतो. काही समाजपंटकांमुळे चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप भोले बाबाने केला आहे.
– स्वयंघोषित धर्मोपदेशक नारायण साकार विश्व हरी ऊर्फ भोलेबाबा याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप असल्याची माहिती समोर आली आहे त्याच्यावर पाच ते सहा गुन्हे दाखल होते. त्यामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते.