![bihar bridge collapse](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/bihar-bridge-collapse-696x447.jpg)
सिवान जिल्ह्यातील गंडकी नदीवरील पुलाचा एक भाग बुधवारी सकाळी कोसळला. गेल्या 15 दिवसांत राज्यातील सात पूल कोसळले आहेत. जिह्यातील देवरिया विभागात असलेला हा छोटा पूल अनेक गावांना महाराजगंजशी जोडतो. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही घटना पहाटे 5च्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार हा पूल 1982-83मध्ये बांधण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. सिवानमध्ये गेल्या 11 दिवसांत पूल कोसळण्याची ही दुसरी घटना आहे. 22 जून रोजी सिवानच्याच दरौंडा भागात पुलाचा एक भाग कोसळला होता. अलीकडेच मधुबनी, अररिया, पूर्व चंपारण आणि किशनगंज यांसारख्या जिह्यांमध्ये अशाच घटनांची नोंद झाली आहे.