झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी बुधवारी राजभवनात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. हेमंत सोरेन लवकरच पुन्हा तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
Champai Soren resigns as Jharkhand CM, Hemant Soren set to return as Chief Minister
Read @ANI Story | https://t.co/WEbzblnPTm#ChampaiSoren #Jharkhand #HemantSoren pic.twitter.com/1dWwG1MhGX
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2024
हेमंत सोरेन यांची पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी निवड करण्याचा निर्णय इंडिया आघाडी आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
हेमंत सोरेन कथित जमीन घोटाळा संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी पाच महिने तुरुंगात होते. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. गेल्या आठवड्यात पुराव्यांअभावी न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. त्यामुळे आता पुन्हा एकदा हेमंत सोरेन झारखंड राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत.