![credit cards](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/credit-cards-696x447.jpg)
हिंदुस्थानात क्रेडिट कार्डचा वापर मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. खिशात पैसे नसतानाही क्रेडिट कार्डच्या जिवावर खरेदी करणाऱयांची संख्याही भरमसाट वाढली आहे. गेल्या तीन वर्षांत क्रेडिट कार्डचा खर्च तीन पटीने वाढून 18 लाख रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. यासंबंधीची आकडेवारी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) ने दिली. या आकडेवारीनुसार, तीन वर्षांत क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन तीन पटीने वाढला. मार्च 2021 मध्ये 6.30 लाख कोटी रुपये होता. मार्च 2022 मध्ये वाढून 9.71 लाख कोटी रुपये आणि मार्च 2023 पर्यंत 14.32 लाख कोटी रुपये झाला. बँकांकडून देण्यात येणाऱया क्रेडिट कार्डची संख्या मार्च 2024 पर्यंत वाढून 10.18 लाख कोटी झाली आहे. क्रेडिट कार्ड सेगमेंटमध्ये खासगी बँकांचा दबदबा पाहायला मिळत आहे. एचडीएफसी बँकेचे 2.11 कोटी क्रेडिट कार्ड आहे. भारतीय स्टेट बँक 1.91 कोटीसह दुसऱया नंबरवर आहे.